Special Report Gold Price Increase | सोनं 1 लाख पार, ऐतिहासित झळाळीमागची कारणं काय?
Special Report Gold Price Increase | सोनं 1 लाख पार, ऐतिहासित झळाळीमागची कारणं काय?
अक्षय तृतीयेचा मुहूर्त तोंडावर आहे. त्यात लग्नसराईचा हंगाम. याचदरम्यान सध्या सोन्याचे दर गगनाला भिडलेयत. आणि आज सोन्यानं एक लाखाचा टप्पा पार केला. मुंबईत सोमवारी सोन्याचा दर एक लाख एक हजारावर गेला. सोन्याच्या या ऐतिहासित झळाळीमागची कारणं काय? या दरवाढीनंतर ग्राहकांची काय आहे प्रतिक्रिया?जाणून घेऊयात या स्पेशल रिपोर्टमधून
१ लाख १ हजार रुपये... सोन्याचा प्रति १० ग्रॅमसाठीचा हा आजचा दर...
सोमवारचा दिवस उजाडला आणि सोन्याच्या दरानं एक नवा उच्चांक गाठला... ऐन अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोनं पहिल्यांदाच एक लाखाच्या पार पार पोहोचलं..
लाखमोलाचं सोनं ---- मुंबई - १,०१,००० पुणे - ९९,१०० नाशिक - ९९,९०० बुलढाणा - १,००,००० जळगाव - ९९,६०० छ. संभाजीनगर - ९९,५०० रत्नागिरी - १,०१,०००.. महाराष्ट्रातल्या या काही महत्वाच्या शहरांमध्ये सोनं एक लाखाच्या पार पोहोचलंय तर काही शहरात लाखाच्या उंबरठ्यावर आहेत.... जळगावच्या सुवर्णनगरीतही सोन्याचे दर एक लाखाच्या घरात पोहोचलेयत...